Chhagan Bhujbal On Sharad Pawar: शरद पवारांनीच भाजपाला शिवसेनेपासून दूर केले

0

नाशिक,दि.9: Chhagan Bhujbal On Sharad Pawar: शरद पवारांनीच भाजपाला शिवसेनेपासून दूर केले अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली. शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. काल शरद पवारांनी येवल्यात सभा घेऊन जनतेची माफी मागितली. शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही टीका केली. येवल्यात आपण चुकीचा उमेदवार दिल्याचे शरद पवारांनी म्हटले होते. छगन भुजबळ हे येवल्याचे प्रतिनिधित्व करतात. शरद पवारांनी केलेल्या टीकेला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.

भाजपाला शिवसेनेपासून दूर केले | Chhagan Bhujbal On Sharad Pawar

2014 मध्ये तुम्ही शिवसेना सोडली, की आम्हीही काँग्रेस सोडू, असे शरद पवारांनी भाजपला सांगितले होते. आमच्या आमदारांची संख्या कमी होती म्हणून आम्ही भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला. त्यानंतर 2017 व 2019मध्येही शरद पवारांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपशी चर्चा केली. शरद पवारांनीच शिवसेनेला भाजपपासून दूर केले, असा गौप्यस्फोटही छगन भुजबळ यांनी केला.

2017 ला मी जेलमध्येच होतो. बाहेर काय झाले माहिती नाही. उद्योगपतीच्या घरी 5 बैठका झाल्या. आम्ही भाजपासोबत राहू शिवसेनेला बाहेर काढा अशी भूमिका पवारांनी घेतली. 2014, 2017 यावेळी शिवसेनेला बाहेर काढा असं शरद पवारांनी म्हटलं. 2019 ला शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली होती. भाजपा-राष्ट्रवादीची सत्ता करू हे ठरले. पवारांच्या सांगण्यावरून भाजपाने तेव्हा शिवसेनेला सोडण्याचे ठरवले. 2019 ला अजित पवारांचा शपथविधी शरद पवारांच्या सांगण्यावरूनच झाला. मला काहीच माहिती नव्हते. अजित पवारांनी हे सांगितले. मग माझ्यावर राग काढायचं कारण काय? प्रफुल पटेल, अजित पवार, जयंत पाटील हेच त्या चर्चेत होते. मी दिल्लीला गेलो नाही. मला दोष देऊन काय उपयोग? असा सवाल मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांना विचारला आहे.

50 मतदारसंघात माफी मागणार का? Chhagan Bhujbal

छगन भुजबळ म्हणाले, येवलामध्ये मला उमेदवारी दिली म्हणून शरद पवारांनी काल येवलावासियांची माफी मागितली. माफी मागण्याचे कोणतेही कारण नव्हते. शरद पवारांनी माफी मागावी, असे कोणतेही काम मी येवल्यात केलेले नाही. शरद पवारांनी काल येवला येथे माफी मागितली तर यापुढे जिथे जिथे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसोबत गेले त्या सर्व मतदारसंघात ते माफी मागणार आहेत काय? शरद पवार आता काय 40-50 मतदारसंघात माफी मागतील काय?

तुम्ही काय करायचे ते करा

छगन भुजबळ म्हणाले की, भाजपासोबत जावं या 54 आमदारांच्या सह्यांमध्ये जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांचाही समावेश आहे. मला शरद पवारांशी बोलायला सांगितले होते. 15 दिवसांचा वेळ घेतल्यानंतर मी राजीनामा देणार त्यानंतर तुम्ही काय करायचे ते करा असं म्हटलं. पुस्तक प्रकाशानाला राजीनामा द्यायचा हे पवारांच्या घरीच ठरले होते. सगळे ठरले होते. त्यानंतर 3 दिवसांनी शरद पवारांनी माघार घेतली. सुप्रिया सुळेंना 10 तारखेला दिल्लीत कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त करायचे हे शरद पवारांनी सांगितले. तेव्हा प्रफुल पटेल म्हणाले मी उपाध्यक्ष आहे. मग तिसऱ्या नंबरवर कशाला येऊ. मी राजीनामा देतो. तेव्हा दोघांना कार्याध्यक्ष करायचे ठरवले. शिंदेंच्या सत्तासंघर्षावेळीही जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल पटेल यांना भाजपा नेत्यांकडे बैठकीला पाठवले. त्या बैठकीतही मी नव्हतो. पण या बैठकीला बडोद्याला जायच्या आधी जयंत पाटील निरोप द्यायला गेले तेव्हा जाऊ नका असं म्हटलं असंही भुजबळांनी सांगितले.   


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here