मुंबई,दि.२: Chhagan Bhujbal On Maratha Andolan: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे अशी मागणी करत मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. मंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेत विविध ओबीसी संघटनांची बैठक सोमवारी मुंबईत झाली.
यावेळी भुजबळ यांनी सरकारला इशारा दिला आहे. राज्यभराताल्या ओबीसी संघटनांकडून जरांगे यांच्या मागणीचा विरोध केला जात आहे. भुजबळ यांच्या उपस्थित राज्यातील महत्त्वाच्या ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
काय म्हणाले छगन भुजबळ? | Chhagan Bhujbal On Maratha Andolan
मराठा आणि कुणबी या वेगवेगळ्या जाती आहेत. मराठा सामाजिक मागास नाहीत असे न्यायालयानेच म्हटले आहे. त्यामुळे मराठा समाजाला काय द्यायचे हा पूर्णपणे सरकारचा प्रश्न आहे. पण आमच्या ओबीसी प्रवर्गात त्यांचा समावेश करू नका. आम्हाला ओबीसीत वाटेकरी नको. तसे झालेच तर आम्ही दुसऱ्या दिवशी न्यायालयात जाऊ, आंदोलन सुरू करू, लाखोंच्या संख्येने आम्हीपण मुंबईत येऊ, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.
ओबीसी आरक्षण बचावसाठी मंगळवारपासून तालुका, जिल्हा पातळीवर आंदोलन सुरू केले जाईल, असे जाहीर केले. ओबीसीतून आरक्षण हे मागास आयोगाच्या मार्फतच देता येते. ते कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या हातात नसते, ओबीसीतूनच आरक्षण याचा हट्टाग्रह कशाला, असा सवालही त्यांनी केला.