“ओबीसीमधून संपूर्ण मराठा सामाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही” छगन भुजबळ

0

सोलापूर,दि.6: पंढरपुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हे सरकार केवळ एका समाजासाठी काम करीत असल्याचे दिसत असून चुकीच्या
पध्दतीने कुणबी जात प्रमाणपत्र वाटण्यात येत असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी करून अशी प्रमाणपत्र घेणार्‍यांवर लक्ष
ठेवावे व याबाबत रितसर तक्रार करावी असे आवाहन पंढरीत ओबीसी समाज एल्गार मेळाव्यात केले.

मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले ओबीसीमधून संपूर्ण मराठा सामाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. भुजबळ यांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. फुलं उधळण्यासाठी 200 जेसीबी आहेत, ते गरीब आहेत. हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव होतोय, ते गरीब आहेत. हे करत असताना, खरोखरच मराठा समाजाचे जे गरीब कार्यकर्ते आहेत, सभेला आले अपघातात गेले. त्यांची त्यांना आठवण नाही असे भुजबळ म्हणाले.

महात्मा ज्योतीबा यांनी शाळा काढताना त्यांच्यासोबत अनेक ब्राम्हण देखील होते. त्यांना ब्राम्हणांनी मदत केली. असे भुजबळ म्हणाले. आमचा मराठा आरक्षणाला आणि मराठा समाजालाही विरोध नाही. पण आरक्षणाखाली जी झुंडशाही सुरु आहे, त्याला आमचा विरोध आहे, मराठा समाजाने स्वतंत्र घ्यावे. 10, 12, 15 टक्के ते स्वतंत्र आरक्षण घ्या. पण यांचं म्हणणं आहे की, ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे. मिळणार नाही. ओबीसीमधून संपूर्ण मराठा सामाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.

“शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आमच्यावर हल्ले करता पण लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लढणारी सेनेला मराठा सेना कधी म्हटलं गेलं नाही तर मावळ्यांची सेना म्हटलं गेलं”, असं छगन भुजबळ म्हणाले. मेळाव्यास महोदव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे,
शब्बीर अन्सारी, टि.पी.मुंडे, कल्याण दळे, दौलत शितोळे, सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here