तुमच्या PF अकाऊंटमध्ये तुमची कंपनी पैसे टाकतेय की नाही असे करा चेक

0

मुंबई,दि.१४: तुमचे पीएफचे पैसे कापले जात असतील, पण ते तुमच्या खात्यात जमा होतायत की नाही हे तपासता येईल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर दर महिन्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी म्हणजेच पीएफ म्हणून तुमच्या पगारातून पैसे कापले जातात. सहसा निवृत्ती निधीच्या दिशेनं हे तुमचं पहिलं पाऊल असतें. तुमची कंपनी तुमच्या पगारातून ठराविक रक्कम कापून दर महिन्याला पीएफचे पैसे जमा करते आणि तुम्हाला त्यावर वार्षिक व्याज मिळतं.

पीएफ अकाऊंटमध्ये कंपनीकडून…

कोणत्याही कर्मचाऱ्याचा बेसिक पे आणि डीएचा १२ टक्के हिस्सा पीएफ अकाऊंटमध्ये जमा केला जातो. कंपनीकडूनही कर्मचाऱ्याच्या खात्यात १२ टक्के योगदान दिलं जातं. कंपनी कॉन्ट्रीब्युशनमधून ३.६७ टक्के रक्कम ईपीएफ खात्यात क्रेडिट केली जाते. तर ८.३३ टक्के रक्कम पेन्शन स्कीममध्ये जमा होते.

कसं चेक कराल?

यासाठी तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्याचं पासबुक तपासावं लागेल. पैसे कधी आणि किती जमा केले याचा तपशील तुमच्या पासबुकमध्ये असेल. तुम्ही ईपीएफओ पोर्टलला भेट देऊन हे तपासू शकता, यासाठी खालील स्टेप्स देण्यात आल्यात.

स्टेप १ – सर्वप्रथम, EPFO पोर्टलवर https://www.epfindia.gov.in/site_en/index.php जा. यासाठी तुम्ही तुमचा UAN (Universal Account Number) अॅक्टिव्ह केलेला असणं आवश्यक आहे.

स्टेप २ – साइट ओपन झाल्यानंतर, ‘Our Services’ टॅबवर जा आणि नंतर ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘for employees’ पर्याय निवडा.

स्टेप ३ – सर्व्हिस कॉलमखाली तुम्हाला ‘member passbook’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल.

स्टेप ४ – त्यानंतर पुढच्या पेजवर तुम्हाला UAN आणि Password एन्टर करावा लागेल.

स्टेप ५ – लॉग इननंतर मेंबर आयडी टाका. त्यानंतर EPF Balance दिसेल. यामध्ये तुम्हाला खात्यातील शिल्लक, सर्व ठेवींचे तपशील, एस्टॅबलिशनमेंट आयडी, मेंबर आयडी, कंपनीचं नाव, एम्प्लॉयी शेअर आणि एम्प्लॉयर शेअरची माहिती देखील मिळते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here