सोलापूर,दि.६ : मटका घेणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशोधरा हॉस्पिटलच्या भिंतीलगत कल्याण नावाचा मटका घेणाऱ्या दोघांविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी १२ करण्यात आली. माजी नगरसेवक सुनील कामाठी आणि राकेश कोरे यांनी प्रोत्साहन दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
म. शरीफ अ. रहिमान बागवान (वय ४०, रा. मोहमद्दीया मशिदीजवळ, बेगम पेठ), शब्बीर अ. सत्तार तेरीकेरी (वय ४०, रा. गोदूताई विडी घरकूल भाग ३, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दोघे लोकांकडून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पैसे घेऊन अंक आकड्यावर पैशांची पैज लावत होते.
कल्याण नावाचा मटका खेळत व खेळवत असताना दोघे आढळून आले. राकेश कोरे, माजी नगरसेवक सुनील कामाठी (दोघे रा. खड्डा तालीम, सोलापूर) यांनी प्रोत्साहन दिल्याने मटका घेतला जात होता, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार जीवनराव पवार यांनी फिर्याद दिली आहे.








