भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट दिले पुस्तक

0

नागपूर,दि.२०: Chandrakant Patil Uddhav Thackeray | भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेत प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट दिले. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नागपुरात विधान भवनाला भेट दिली आणि आमदारांसोबत बैठक घेतली. तसंच ठाकरे गटाला देण्यात आलेल्या कार्यालयाचीही पाहणी त्यांनी केली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी थेट ठाकरे यांना गाठलं. पाटील यांनी प्रबोधनकार ठाकरेंचं ‘माझी जीवनगाथा’ हे पुस्तक ठाकरेंना भेट म्हणून दिलं. सोबत त्यातील एक संदर्भ आवर्जुन उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून दिला. ज्याची आता चर्चा सुरू झाली आहे. (Chandrakant Patil Uddhav Thackeray)

चंद्रकांत पाटील यांनी दिला प्रबोधनकारांच्या पुस्तकाचा संदर्भ

भीग मागणं हा उल्लेख प्रबोधनकारांनीही त्यांच्या पुस्तकात केल्याचं चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली या चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पण आपण वापरलेल्या शब्दांमध्ये काही गैर नव्हतं हे पटवून देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी प्रबोधनकारांच्या पुस्तकाचा संदर्भ उद्धव ठाकरेंना वाचून दाखवला. यावेळी उद्धव ठाकरेंनीही चंद्रकांत पाटील यांच्या चर्चा केली आणि त्यांचं म्हणणं मांडलं. 

चंद्रकांत पाटील

पाटील यांनी घेतली ठाकरे यांची भेट | Chandrakant Patil Uddhav Thackeray

हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे आज नागपुरात उपस्थित होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘माझी जीवनगाथा’ हे पुस्तक चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना भेट म्हणून दिले.

चला माझ्यासोबत भीक मागायला कोण येणार?

चला माझ्यासोबत भीक मागायला कोण येणार? असं प्रबोधनकार यांनी पुस्तकात उल्लेख केला असल्याचं चंद्रकांत दादांनी उद्धव ठाकरेंना निदर्शनास आणून दिलं. आपण केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकातदादांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना आपली बाजू सांगितली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here