छत्रपती संभाजीनगर,दि.२७: Chandrakant Khaire On Politics: ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी मोठा दावा केला आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत. अशातच भाजपा शिंदे गटातही यावरून मतभेद असल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पार्टीकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची खंत शिवसेना खासदार गजान कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी व्यक्त केली आहे. तसेच आमची कामे होत नसल्याची तक्रारही त्यांनी मांडली. आमची शिवसेना ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) एक घटक पक्ष असून तसा दर्जा आम्हाला मिळाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, लोकसभेच्या जागावाटपावर प्रश्न विचारल्यावर कीर्तिकर म्हणाले आमच्या २२ जागा आहेत. त्यावर दावा करण्याची गरज नाही, त्या जागा शिवसेनेच्याच असून आम्हाला त्या मिळायला हव्यात.
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा दावा | Chandrakant Khaire On Politics
खासदार गजानन कीर्तिकर यांच्या या वक्तव्यावर राजकीय स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काल भाजपाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्यावर आता शिवसेना (शिंदे गटाचे) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. खैरे यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितलं की, केवळ १३ बंडखोर खासदार एकनाथ शिंदेंना जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे भाजपाने शिंदे गटाला २२ जागा देण्याचा प्रश्नच येत नाही.
माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, भाजपाने माहिती घेतली आहे त्याप्रमाणे यांच्यापैकी (शिंदे गटातले १३ खासदार) एकही जण निवडून येणार नाही. मग कशाला देतील ते इतक्या जागा. मुळात भारतीय जनता पार्टीने याबाबत एक सर्वेक्षण आधीच केलं आहे, ते प्रसिद्धही केलं आहे. त्यानुसार या १३ जणांपैकी एकही खासदार निवडून येणार नाही.
चंद्रकांत खैरे म्हणाले, मी स्पष्ट सांगतोय यांची (भाजपा – शिंदे गट) आपसात भांडणं सुरू झाली आहेत. गजाभाऊ कीर्तिकर यांनी सांगितलं की आमची कामं होत नाहीत ते खरंच आहे. आता त्यांना सजलंय की आपण चूक केली आहे. गजाभाऊ अगदी करेक्ट ट्रॅकवर आले आहेत. त्यांना माहितीय आता आपलं काही खरं नाही. आगामी लोकसभेला त्यांच्या मुलाला त्यांच्याविरोधात उभं केलं जाऊ शकतं, त्यामुळे ते चिंतेत आहेत.