मेघगर्जनेसह पुढील 24 तासांत पावसाची शक्यता

0

मुंबई,दि.4: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या पट्ट्याचं तीव्र दाब क्षेत्रात रूपांतर झालं आहे. त्यामुळे त्याचे आता मिचॉन्ग चक्रीवादळात रूपांतर झालं आहे. त्यामुळे 4 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासांत महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतीचे मोठं नुकसान झालं असून आता पुन्हा एकदा राज्यात 24 तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

24 तासांत विजांच्या गडगडाटासह पाऊस

‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील 24 तास पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणामी राज्यातही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात पुढील 24 तासांत विजांच्या गडगडाटासह पाऊस पाहायला मिळेल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

मिचॉन्ग चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये 21 पथकं तैनात केल्या आहेत. आठ अतिरिक्त टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती (NCMC) च्या बैठकीत चक्रीवादळासाठी राज्य सरकारे आणि केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here