सोलापूर,दि.9: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी सामना आज रविवारी (9 मार्च) होणार आहे. पण या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना या दोन संघांमध्ये होऊ शकतो, भारतीय संघातील 4 खेळाडूंना याची आधीच कल्पना होती. या चार खेळाडूंमध्ये शुभमन गिल, केएल राहुल, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे.
भारत आणि न्यूझीलंड संघात चॅम्पिअन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पार पडणार आहे. या सामन्यावर फक्त क्रिकेटप्रेमीच नाही तर सट्टाबाजाराचंही लक्ष आहे. यादरम्यान दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने मोठी कारवाई करत पाच सट्टेबाजांना अटक केली आहे. या सर्वांनी सेमी-फायनल सामन्यावर सट्टा लावला होता. त्यांची चौकशी केली असताना धागेदोरे दुबईपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.
पोलिसांनी केलेल्या चौकशीतून अंतिम सामन्यावर तब्बल 5 हजार कोटींचा सट्टा लावण्यात आल्याची माहिती समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे. इतकंच नाही, दाऊद इब्राहिमची ‘डी कंपनी’ दुबईत झालेल्या मोठ्या सामन्यांमधील सट्ट्यात सहभागी आहे.
खरंतर, हा व्हिडिओ आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) ने १७ फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होण्यापूर्वी शूट केला होता. जिथे भारतीय संघातील ४ खेळाडूंना काही प्रश्न विचारण्यात आले.
त्या सर्वांना विचारण्यात आले की स्पर्धेत ते कोणत्या सामन्यावर लक्ष ठेवून आहेत? तेव्हा कुलदीप यादव, केएल राहुल, मोहम्मद शमी आणि शुभमन गिल यांनी एका सुरात म्हटले होते की त्यांचे लक्ष ९ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यावर आहे. शुभमन गिल हसला आणि म्हणाला, फायनल… कारण फायनल हा फायनलच असतो.
यावेळी, आयसीसी यजमानाने कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो असा प्रश्नही विचारला. यावर कुलदीप यादव म्हणाला होता, न्यूझीलंड, कारण तो खूप चांगला संघ आहे. केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांनाही न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याबद्दल आत्मविश्वास होता.