कोव्हिड-19: कोरोना निर्बंधा बाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

0

नवी दिल्ली,दि.२३: केंद्र सरकारने कोरोनाच्या (Covid-19) निर्बंधा बाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशात कोरोना (कोव्हिड-19) रुग्णांची संख्या कमी होत आहे. देशात कोरोनाची तिसरी लाटेत (Corona Third Wave) अनेकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली नाही. देशात लसीकरण (Vaccination) मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. सरकारने २०२० पासून अनेक निर्बंध लादले होते. मात्र आता तब्बल दोन वर्षांनंतर कोव्हिड-19 संदर्भात लादण्यात आलेले निर्बंध ३१ मार्चपासून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असून केवळ मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबतचा निर्णय घेतला आहे.

देशात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने सरकारने आता निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत लागू करण्यात आलेली निर्बंध हटवण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

निर्बंध हटवण्याचा निर्णय घेत असताना आरोग्य मंत्रालयाने स्थानिक परिस्थितीनुसार प्रशासनाला काही अधिकार दिले आहेत. ‘जर एखाद्या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली तर विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ते राज्य निर्णय घेऊ शकते,’ असा सल्लाही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here