सोलापूर,दि.1: 27 फेब्रुवारी 2022 रोजी श्री सिद्धेश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये मराठी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेच्या शिक्षिका बरबडे यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमास मुख्याध्यापक धनंजय शिरूर व पर्यवेक्षक बिराजदार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे समूह गीत सादर केले त्यानंतर अंजली खानापुरे टीचर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर बरबडे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जयवर्धन गवळी, आदित्य कलागते या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. तेजस कलागते या विद्यार्थ्याने संत ज्ञानेश्वराची माहिती सांगितली. आनंदी मदन शेट्टी या विद्यार्थिनीने कणा ही कविता व वेदश्री मूंगा पाटील या विद्यार्थिनीने चिऊताई ही कविता सादर केली. सिद्धी पांडे (वि .स खांडेकर) तनिष्का विभुते( वि. दा. करंदीकर) अथर्व गणपा( वि. वा. शिरवाडकर) श्रुती टीचर (भालचंद्र नेमाडे) यांनी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या साहित्यकार यांची माहिती सांगितली.

शलाका मठ या विद्यार्थिनीने एकपात्री नाटक सादर केले. त्यानंतर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्तम रित्या नाटकाचे सादरीकरण केले. धनश्री कमलापुरे या विद्यार्थिनीने मराठी साहित्य प्रकारांची ओळख करून दिली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत असले तरी मराठी खूप छान बोलतात. विद्यार्थ्यांच्या मराठी भाषा शैलीचे कौतुक केले. त्यानंतर पर्यवेक्षक बिराजदार यांनी मातृभाषेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता तमशेट्टी यांनी केले व आभार विजयालक्ष्मी बिराजदार यांनी मांडले. त्यानंतर इशिता गुमडेल या विद्यार्थिनीने पसायदान सादर केले. अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.