CDS Bipin Rawat : सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, 14 पैकी 13 जण ठार

0

CDS Bipin Rawat Helicopter Crash : तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी दुपारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत (Bipin Rawat) यांना घेऊन जाणारे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. (Bipin Rawat Latest Updates) या घटनेदरम्यान हेलिकॉप्टरमध्ये (Army Helicopter Crash) सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांच्याशिवाय त्यांची पत्नी आणि इतर लष्करी अधिकारीही उपस्थित होते. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

लष्कराच्या या हेलिकॉप्टरमध्ये (Helicopter) एकूण 14 जण होते. आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातात मृतांची संख्या 13 झाली आहे. अपघातानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना अपघाताची माहिती देण्यात आली.

हेलिकॉप्टरमध्ये संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत, (CDS Bipin Rawat) त्यांची पत्नी व अन्य अधिकारी असे 14 जण होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार यातील 13 जणांचा मृत्यू झाला असून डिएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवली जाणार आहे. सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने (ANI) हे वृत्त दिले आहे.

ताज्या अहवालात असे सांगितले जात आहे की सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांना घटनास्थळावरून स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. साधारण सहा वर्षांपूर्वी जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) हेलिकॉप्टर अपघातात थोडक्यात बचावले होते. 3 फेब्रुवारी 2015 रोजी नागालँडमधील दिमापूर येथे क्रॅश झालेल्या चित्ता हेलिकॉप्टरमध्ये रावत होते. त्यावेळी ते लेफ्टनंट जनरल होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here