LPG Cylinder बुकिंगवर Paytm द्वारे 3000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक

0

दि.15: तुम्ही जर Paytm वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या गॅस सिलेंडरच्या (LPG gas) किंमतींमुळे सर्वसामान्य त्रस्त असताना पेटीएमवर घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर जबरदस्त ऑफर (Paytm offer on LPG booking) देत आहे. या ऑफरअंतर्गत घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगवर 3000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक (Cashback) मिळू शकतो. हा कॅशबॅक तीन भागात मिळू शकतो. सिलेंडरच्या बुकिंगसाठी तुम्हाला पेटीएम वॉलेट, यूपीआय किंवा नेटबँकिंगद्वारे पेमेंट करावं लागेल.

Paytm ची ही ऑफर केवळ अशा लोकांसाठी आहे, ज्यांनी आतापर्यंत पेटीएमच्या माध्यमातून गॅस बुकिंग केलेलं नाही. जर तुम्ही गॅस सिलेंडर आधी कधी पेटीएमद्वारे बुक केला असेल, तर ही ऑफर तुमच्यासाठी लागू होणार नाही.

काय आहे ऑफर

पेटीएमचा (Paytm) वापर करताना पहिल्या तीन गॅस सिलेंडर बुकिंगवर 1000 रुपये प्रति बुकिंगनुसार कॅशबॅक मिळू शकतो. पहिल्या बुकिंगवर हा कॅशबॅक 10 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत असू शकतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या सिलेंडर बुकिंगवर स्क्रॅच कार्डमध्ये 5 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

ही ऑफर केवळ अशा ग्राहकांसाठी आहे, जे Paytm App चा वापर करुन पहिल्यांदा बुकिंग करत आहेत. कमीत-कमी 500 रुपयांच्या बुकिंगवर ही ऑफर वैध मानली जाईल. या ऑफरसाठी तेव्हाच योग्य मानलं जाईल, ज्यावेळी गॅस सिलेंडरचं बुकिंग पेटीएम वॉलेट, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट होईल.

पहिलं सिलेंडर बुकिंग, पेमेंट डिसेंबर 2021 पर्यंत करावं लागेल. त्यानंतर ऑफर ॲक्टिवेट होईल आणि पहिलं स्क्रॅच कार्ड युजरला मिळेल. युजरला पुढील दोन बुकिंगदेखील पुढील 2 महिन्यात कराव्या लागतील.

बुकिंग झाल्यानंतर स्क्रॅच कार्ड मिळेल, जे ओपन करुन तुमचा कॅशबॅक क्लेम करू शकता. स्क्रॅच कार्ड ओपन न झाल्यास, कॅशबॅक अँड ऑफर सेक्शनमध्ये हे पाहता येईल. एकदा ट्रान्झेक्शन झाल्यानंतर जवळपास 24 तासांच्या आत स्क्रॅच कार्ड मिळतं आणि हे 7 दिवसांनंतर एक्सपायर होतं. स्क्रॅच कार्ड ओपन केल्याच्या 72 तासांमध्ये कॅशबॅक पेटीएम वॉलेटमध्ये येतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here