Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे भारतात आली समोर, कर्नाटकात 2 संक्रमित आढळले

0

Omicron Veriant: कोविडच्या (Covid – 19) ओमिक्रॉन (Omicron) या नवीन प्रकाराची प्रकरणे भारतात समोर आली आहेत. कर्नाटक (Karnataka) राज्यात या प्रकाराचे 2 बाधित आढळले आहेत. गुरुवारी, आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, देशात कोविडच्या ओमिक्रॉनच्या प्रकरणाची पुष्टी झाल्याने चिंता वाढली आहे. ही दोन्ही प्रकरणे कर्नाटकात नोंदवली गेली आहेत आणि ही प्रकरणे 66 आणि 46 वर्षे वयोगटातील दोन व्यक्तींमध्ये नोंदवली गेली आहेत. या दोघांनाही किरकोळ लक्षणे आहेत.आतापर्यंत जगातील या प्रकारातील सर्व प्रकरणांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत.

कोरोना प्रकाराबाबत, नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल म्हणाले की, आम्ही कोरोना महामारीमध्ये जी साधने वापरली आहेत, तीच आम्हाला करावी लागतील. हे एक नवीन आव्हान आहे. आम्ही प्रकरण पकडण्यात यशस्वी झालो म्हणजेच यंत्रणा कार्यरत आहे. मास्क ही सार्वत्रिक लसीसारखी आहे, त्याबद्दल निष्काळजी राहू नका. हे सर्व प्रकार अवरोधित करते. यासोबतच हवेशीर वातावरणात राहा. घाबरण्याची गरज नसून जबाबदारी दाखवताना सतर्क राहावे लागेल, असे ते म्हणाले. या नव्या आव्हानालाही सामोरे जावे लागेल.

https://twitter.com/ANI/status/1466362949006626821?t=QjmJd9djxweplWSeXmaToA&s=19

कर्नाटकमध्ये आढळलेल्या दोन्ही रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे नाहीत. दोन्ही ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. देशात आणि जगभरातील अशा सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत कोणतेही गंभीर लक्षण आढळून आलेले नाही. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की त्याच्या पुराव्यांचा अभ्यास केला जात आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. 

जिनोम सिक्वेंसिंगद्वारे कर्नाटकातील दोन रुग्णांना कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिअंटची बाधा झाल्याचे समोर आले आहे. देशात 37 लॅब आहेत. ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले म्हणून लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, परंतू काळजी घेणे गरजेचे आहे, असेही अग्रवाल म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here