सोलापूर,दि.5: Jayraj Nagansure News: तोतया व्यक्ती उभी करून परस्पर जमीन हडपल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर हिरज तालुका उत्तर सोलापूर येथील गट नंबर 230/ 2 मधील 15 एकर 28 गुंठे शेत जमीन तिघांनी बनावट कागदपत्र तयार करून तोतया व्यक्ती उभा करून हडप केली. त्यानुसार विजय तुकाराम खडतरे सहाय्यक दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर दोन यांनी सरकारतर्फे सदर बाजार पोलीसात तक्रार दिली.
एका व्यक्तीने मुकुंदराज चंद्रकांत गायकवाड असल्याची भासवून ती जमीन रमेश कुमार बन्सीलाल राहणार पुणे रोड यांना विकली 2002 पासून मुकुंदराज गायकवाड हे स्वतःची जमीन परत मिळावी, म्हणून पाठपुरावा करत होते परंतु त्यांना कुठलीही दाद मिळत नव्हती. 2002 साली बोगस मुकुंदराज गायकवाड यांनी रमेश कुमार बन्सीलाल व्यास यांनाही जमीन विकली. त्यानंतर रमेश कुमार बन्सीलाल व्यास यांनी ही जमीन अनिल जाधव यांना विकली.
अनिल जाधव यांनी ही जमीन लोनावत यांना विकली लोनावत यांनी ही जमीन माजी आमदार दिलीप माने यांच्या पत्नींना विकली. गेल्या वीस वर्षापासून मुकुंदराज गायकवाड ही व्यक्ती न्यायासाठी स्वतःच्या हक्कासाठी लढत आहे. तरी त्या व्यक्तीची दखल घेतली गेली नाही.
सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसूरे व ॲड. सौरव साळुंखे यांनी याची दखल घेत 2020 साली सर्व पुराव्यानुसार तक्रार दाखल केली व त्यांच्या पाठपुराव्याला आज यश मिळाले. त्यावरून महबूब इब्राहिम सय्यद राहणार बुधवार पेठ, पठाण चाळ व गंगाधर नामदेव शेंडेकर राहणार वडदेगाव तालुका मोहोळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.