नोएडा,दि.२३: उत्तर प्रदेशातील नोएडा इथं आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्राविरोधात (Motivational Speaker Vivek Bindra) गुन्हा दाखल झाला आहे. ही तक्रार त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या भावाने दिली आहे. विवेक बिंद्रा यांनी पत्नी यानिकाला खोलीत बंद करून मारहाण केल्याचा आरोप आहे. यानिकाला शिवीगाळ करत तिचा शारीरिक छळ विवेक बिंद्रा यांनी केल्याचे म्हटलं आहे.
तक्रारीनुसार, विवेक यांनी यानिकाचे केस ओढून तिच्या चेहऱ्यावर मारहाण केली. तिचा मोबाईल फोडून टाकला. या मारहाणीत यानिकाच्या कानाचा पडदा फाटला. त्यानंतर आता विवेक बिंद्राविरोधात नोएडा येथे गुन्हा दाखल झाला आहे. ६ डिसेंबरला विवेकचं यानिकासोबत लग्न झाले होते. त्यानंतर ८ डिसेंबरला ही मारहाणीची घटना घडली.
त्यानंतर यानिकावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.यानिकाचे भावाने १४ डिसेंबरला विवेक यांच्याविरोधात तक्रार दिली. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. त्यात विवेक बिंद्रा सोसायटीच्या गेटवर पत्नीशी वाद घालत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
रागाच्या भरात विवेकने यानिकाला खोलीत बंद केले, त्यानंतर तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तिचा मोबाईल तोडला. तिचे केस ओढले. या मारहाणीत यानिका जखमी झाली. डोक्याला मार लागल्याने तिला चक्कर आली. कानाने काही ऐकायला येत नव्हते. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानिकाने भावाला फोन केल्यानंतर जेव्हा भाऊ वैभव यानिकाच्या घरी पोहचला तेव्हा हा प्रकार उघड झाला. या मारहाणीच्या घटनेने माझ्या बहिणीला वेदना झाल्या आहेत. तिची मानसिक स्थिती ढासळली आहे असं वैभवने म्हटलं.
कोण आहेत विवेक बिंद्रा?
विवेक बिंद्रा हे बडा बिझनेसचे सीईओ आहेत. त्यांच्या कंपनीचे नाव बडा बिझनेस असे आहे. या कंपनीत लोकांना इंटरप्रेन्योरशिप आणि व्यवसायिक ट्रेनिंग आणि सल्ले दिले जातात. या कंपनीचा टर्नओव्हर ५० कोटी इतका असल्याचे बोलले जाते. विवेक बिंद्रा हे युट्यूबवर खूप प्रसिद्ध आहेत. आज त्यांच्या चॅनेलला २१.४ मिलियन म्हणजे २ कोटीहून अधिक सबस्क्राईबर्स आहेत. विवेक बिंद्रा यांच्यावर पत्नीने भावाने आरोप केलेत, त्यात म्हटलंय की, माझी बहीण यानिका हिचे ६ डिसेंबरला विवेक बिंद्रासोबत ललित मानगर हॉटेलमध्ये लग्न झाले. विवेक सध्या सेक्टर ९४ येथील सुपरनोवा वेस्ट रेजीडेंसीमध्ये राहतात. लग्नाच्या दोन दिवसांनी ८ डिसेंबरला सकाळी ३ वाजता विवेक त्यांच्या आईसोबत वाद घालत होते. तेव्हा त्यांची पत्नी यानिका तिथे पोहचल्या. आई-मुलाचा वाद सोडवण्याचा यानिकाने प्रयत्न केला. परंतु विवेक पत्नी यानिकावर संतापले.
पहिल्या पत्नीसोबत कोर्टात वाद
विवेक बिंद्रा मोटिवेशनल स्पीच आणि सल्ला देण्याचे काम करतात. परंतु त्यांचा संसार सुरळीत चालवण्यात त्यांना यश आले नाही. त्यांची पहिली पत्नी गीतिका सबरवाल यांच्यासोबतही त्यांचा वाद सुरू आहे. सध्या हा वाद कोर्टात आहे. गीतिकाने पती विवेककडून माझ्या जीवाला धोका आहे असा आरोप केला आहे. दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात आहे. या दोघांना एक मुलगाही आहे. पहिल्या पत्नीच्या वादानंतर विवेकने यानिकासोबत दुसरे लग्न केले.