नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यावर गुन्हा दाखल

0

सोलापूर, दि.29: सोलापूर (Solapur) शहरामध्ये कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले नसतानाही हजारोंची गर्दी करत नियमांचा भंग केल्याप्रकरणी नगरसेवक आनंद चंदनशिवे (Aanand Chandanshive) यांच्यासह दोघांवर सदर बजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत तिपन्ना गायकवाड राहणार मिलिंद नगर, बुधवार पेठ, व नगरसेवक आनंद चंदनशिवे (Aanand Chandanshive) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर मुटकुळे नेमणूक सदर बझार पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे.

सोलापुरात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. त्या महामंडळाची वार्षिक बैठक रविवार 27 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता नॉर्थकोर्ट मैदानावर घेण्यात आली. त्या बैठकीला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

दरम्यान महापालिका आयुक्तांनी गर्दी न करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक आदेश जारी केले असतानाही त्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी भादंविसक 188, आपत्ती व्यवस्थापन अधि 2005 चे कलम 51 (ब), सह भारतीय साथ रोग अधि चे कलम 3 सह मपोका क 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here