सोलापूर,दि.15: सोलापूर व धाराशिव या जिल्हयातील महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेत असलेल्या अनुसचित जमातीच्या विदयार्थ्यांसाठी सन 2023-24 शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर अधिनस्त असलेल्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील अनुसचित जमातीच्या विदयार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जमातीच्या विदयार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्क (फ्रीशीप) शिष्यवृत्ती योजना, राज्यातील शासन मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्था मधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीची योजनेसाठी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा अर्ज परिपूर्ण व मूळ कागदपत्रासह भरण्यासाठी खाली दिलेल्या संकेत स्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्रकल्प अधिकारी गायकवाड यांनी केले आहे.
संकेतस्थळ – https://mahadbt.maharashtra.gov.in