मुंबई,दि.14: Cabinet Portfolios Allotment: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडील सर्वात मोठं खात अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं देण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शपथविधी घेऊन 10 दिवस झाले तरी अद्याप खातेवाटप जाहीर झाले नाही. बिनखात्याचे मंत्री म्हणून राष्ट्रवादी मंत्र्यांवर विरोधकांकडून टीका होत होती.
Cabinet Portfolios Allotment | खाटेवाटपाचा तिढा सुटला?
महायुतीत नव्यानं दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) अर्थ खात्यासोबतच सहकार खातंही मिळण्याची शक्यता आहे. सहकार खातं दिलीप वळसे पाटलांकडे आणि छगन भुजबळांकडे अन्न आणि औषध पुरवठा खातं सोपवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थ खात्यासह सहकार खात्यासाठीही आग्रही असल्याचं बोललं जात होतं. अखेर अर्थ खात्यासोबतच सहकार खातंही राष्ट्रवादीकडेच जाणार असल्याचं बोलंल जात होतं. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे सर्वात महत्त्वाची समजली जाणारी अर्थ आणि गृह अशी दोन्ही खाती होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील अर्थ खातं अजित पवारांकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे.
सुरुवातीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाकडे ही खाती होती. मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा समावेश झाल्याने ही खाती भाजपाकडून राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत. अजित पवार यांना अर्थ खाते देऊ नये यासाठी शिवसेना आमदारांनी आग्रही मागणी केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाल्याने आता अर्थ खाते अजित पवारांना मिळणार हे स्पष्ट झाले आहे.
महिला आणि बाल विकास मंत्रालय, युवक कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे.