मुंबई,दि.5: सोशल मिडीयावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. गावामध्ये गाय, म्हैस असे पाळीव प्राणी पाळले जातात. दुग्धोउत्पानासाठी यांचा वापर केला जातो. त्यामुळे गावामध्ये सर्रास तुम्हाला गायी, म्हशी पहायला मिळतील. रस्त्यानंही अनेकदा त्या आढळून येतात. मात्र पाळीव असले तरी हे प्राणी बऱ्याचदा धोकादायक ठरतात. कधी अचानक हल्ला करतील सांगू शकत नाही. अशीच एक घटना समोर आलीय, ज्यामध्ये एका रस्त्याने जाणाऱ्या म्हशीने गाडीवर जाणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओही समोर आलाय.
म्हशीने अचानक एका दुचाकीस्वारावर हल्ला केल्याची घटना घडली. हा हल्ला एवढा भयानक होता की, दुचाकीस्वार दूरवर उडून पडला आणि गाडी एकीकडे पडली. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला आपल्या पाळीव म्हशीला घेऊन आरामात रस्त्यानं चाललीय. समोरुन गाडी येणार म्हणून महिला म्हशीला एका बाजूला करते. गाडी भरधाव वेगानं येते आणि म्हशीच्या बाजूने जायला लागते. तेवढ्यात म्हैस पलटते आणि दुचाकीस्वाराला जोरदार धडक देते. या हल्ल्यात दुचाकीस्वार गाडीसह खाली कोसळतो. गाडी एका बाजूला जाते आणि व्यक्ती एका बाजूला.
हे पाहून म्हशीची मालक महिलेलाही धक्का बसतो. तिला काय करावं सुचत नाही. मग ती म्हशीकडे न जाता खाली पडलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी सरसावते. bukharanewsuz नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येताना पहायसा मिळत आहेत. कदाचित या फटफटी गाडीच्या आवाजानं म्हशीला राग आल्यामुळे तिनं हल्ला केल्याचं म्हटलं जातंय. तर काहींनी म्हटलं की, प्राणी कधी आक्रमक होईल सांगू शकत नाही.
दरम्यान, समोर आलेल्या व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे याविषयी माहिती समोर आली नाही. मात्र हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसतोय.