अर्थसंकल्पात मध्यमवर्गासाठी सरकारची मोठी घोषणा

0

सोलापूर,दि.1: अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. सर्वसामान्यांपासून ते कॉर्पोरेट जगतापर्यंत या अर्थसंकल्पाची आतुरतेने वाट पाहत होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, 36 जीवनरक्षक औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द केला जाईल. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर बांधले जातील. कर्करोगावरील उपचारांसाठी औषधे स्वस्त होतील. 6 जीवरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी कमी करून 5 टक्के करण्यात येणार आहे. 

अर्थसंकल्पात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या घोषणा

12 लाखांपर्यंतच्या कमाईवर कोणताही आयकर लागणार नाही. 

अर्थमंत्री म्हणाले- पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणले जाईल. या प्रत्यक्ष कर सुधारणा नंतर स्पष्ट केल्या जातील.

कॅन्सरची औषधे स्वस्त होणार, मागील 4 वर्षांचे आयटी रिटर्न एकत्र भरले जातील.

ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे.

आयकर भरण्याची मर्यादा 2 वर्षांवरून 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पुढील सहा वर्षे मसूर आणि तूर या डाळींचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात येणार आहे. 

बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन होणार असून, लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

छोट्या उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड, पहिल्या वर्षी 10 लाख कार्ड जारी केले जातील.

एमएसएमईसाठी कर्ज हमी कवच ​​5 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपयांपर्यंत वाढवले ​​जाईल, 1.5 लाख कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल.

स्टार्टअपसाठीचे कर्ज 10 कोटींवरून 20 कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाईल. हमी शुल्कातही कपात केली जाईल. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here