दि.1: Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी चौथा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. पण सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार आहे आणि कशाकडून दिलासा मिळणार आहे, जाणून घेऊयात काय महाग आणि काय स्वस्त…
स्वस्त होणार चार्जर
अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनविण्यावर भर देण्यात आला आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी मोबाईल फोन चार्जर, मोबाईल फोन कॅमेरा लेन्स, ट्रान्सफॉर्मर इत्यादींवर शुल्क सवलत जाहीर केली आहे.
हिरे आणि दागिने स्वस्त होणार
रत्न आणि दागिने उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील कस्टम ड्युटी 5% पर्यंत कमी केली आहे. सिंपली सॉंड डायमंडवर कस्टम ड्युटी लागणार नाही.
आर्टिफिशियल दागिने महाग होतील
बजेटमध्ये कमी मूल्य नसलेल्या आर्टिफिशियल (कृत्रिम) दागिन्यांच्या आयातीला परावृत्त करण्यासाठी सरकारने आता त्यावरील आयात शुल्क 400 रुपये प्रति किलो केले आहे. अशा परिस्थितीत हे दागिने आगामी काळात महाग होऊ शकतात.
छत्र्या महाग होणार
पावसात भिजण्यापासून संरक्षण करणाऱ्या छत्र्या आतापासून महाग होणार आहेत. सरकारने अर्थसंकल्पात त्यांच्यावरील कर वाढवून 20% केला आहे. यासोबतच छत्री बनवताना वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सवरील करमाफी रद्द करण्यात आली आहे.
स्टील स्क्रॅप आयात स्वस्त होईल
लघु आणि मध्यम उद्योगांना दिलासा देत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात स्टील स्क्रॅपवरील कस्टम ड्युटी सवलत एका वर्षासाठी वाढवली आहे. यामुळे एमएसएमई क्षेत्रातील स्क्रॅपपासून पोलाद उत्पादने बनवणाऱ्यांना सोपे जाईल.
स्वस्त
कपडे, चामड्याचा वस्तू
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
मोबाईल फोन, चार्जर
हिऱ्याच्या वस्तू, दागिने
शेतीची अवजारे
कॅमेरा लेन्सेस स्वस्त होणार
विदेशातून येणाऱ्या मशिन्स
चप्पल आणि बुट्स
इंधन स्वस्त होण्याची शक्यता
इम्पोर्टेड केमिकल स्वस्त होणार
महाग
छत्र्या महाग होणार
क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महाग