नवी दिल्ली,दि.10: Brazil President On RRR: ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी आरआरआर चित्रपटाचे तोंडभरून काैतुक केले आहे. आरआरआर चित्रपटाने मोठा धमाका केलाय. आरआरआर (RRR) चित्रपटाची हवा फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही बघायला मिळाली. आरआरआर चित्रपटाने थेट ऑस्करमध्ये डंका वाजवली. मोठा धमाका ऑस्करमध्ये आरआरआर चित्रपटाने केला. फक्त ऑस्कर हाच नाही तर आरआरआर चित्रपटाला आतापर्यंत अनेक पुरस्कार हे मिळाले आहेत. एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांचे आरआरआर चित्रपटासाठी सर्वत्र काैतुकही करण्यात आले. आरआरआर चित्रपटाने नक्कीच मोठा एक इतिहास लिहिला आहे. आरआरआर ब्लॉकबस्टर ठरला.
ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी आरआरआर चित्रपटाचे केले तोंडभरून काैतुक | Brazil President On RRR
जी20 शिखर संमेलन हे सध्या दिल्ली येथे सुरू आहे. भारतामध्ये अनेक देशांचे राष्ट्रपती दाखल झाले आहेत. नुकताच ब्राजीलचे राष्ट्रपती लुइज इनासियो लूला डी यांना भारतीय चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी लुइज इनासियो लूला डी यांनी थेट म्हटले की, मला आरआरआर हा भारतीय चित्रपट सर्वात जास्त आवडला आहे. तो माझा आवडतीचा चित्रपट आहे.
ब्राजीलचे राष्ट्रपती लुइज इनासियो लूला डी (Luiz Inácio Lula da Silva) पुढे म्हणाले की, आरआरआर हा चित्रपट तीन तासांचा फिचर चित्रपट असून त्यात मजेदार दृश्ये आणि सुंदर असा डान्स आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटात ब्रिटिशांवरही टीका करण्यात आलीये. मला वाटते की, आरआरआर चित्रपट यशस्वी व्हावा, मी ज्यांना कोणाला भेटतो, त्यांना म्हणतो की, तुम्ही 3 आर चित्रपट बघितला आहे का?
मी या चित्रपटाचा खूप जास्त आनंद घेतलाय. ब्रिटिशांवर टिका देखील एकदम बरोबर करण्यात आलीये. निर्मात्यांनी टीकेसाठी कॉमिक सीनचा वापर केला आहे. मी दिग्दर्शक आणि कलाकारांचे अभिनंदन करतो, कारण खरोखरच चित्रपट पाहून मला खूप आनंद झाला. ब्राजीलच्या राष्ट्रपतींनी आरआरआर चित्रपटाचे तोंडभरून काैतुक केले आहे.
राजामौली यांनी दिली प्रतिक्रिया
आता यावर आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी एसएस राजामौली हे ब्राजीलचे राष्ट्रपती लुइज इनासियो लूला डी यांचे आभार मानताना दिसले आहेत. एसएस राजामौली यांनी म्हटले की, सर यासर्व शब्दांसाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. मला हे जाणून खूप चांगले वाटले की, तुम्ही भारतीय चित्रपट आणि आमचा आरआरआर चित्रपटाचा आनंद घेतला.
यामुळे आमची पूर्ण टिम आनंदी आहे. आशा करतो की, सध्या तुम्ही भारतामध्ये चांगला वेळ घालवत आहात. आता एसएस राजामौली यांनी केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. म्हणजेच काय तर फक्त भारतीयांनाच नाही तर आरआरआर हा चित्रपट विदेशातील लोकांना देखील आवडल्याचे दिसत आहे.