Booster Dose: लसीच्या बूस्टर डोससाठीही रजिस्ट्रेशन करावे लागेल का? कुठली मिळणार लस

0

नवी दिल्ली, दि.8: Precaution Dose: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की कोविड -19 लसीचा (Covid-19 Vaccine) प्रिकॉशन (Precaution) डोस घेण्यासाठी पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. हा डोस 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी आणि आघाडीचे कर्मचारी आणि 60 वर्षांवरील इतर आजारांनी ग्रासलेल्या वृद्ध लोकांना आहे. ज्यांना याआधी लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, ते थेट अपॉइंटमेंट घेऊ शकतात किंवा हा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रात जाऊ शकतात.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ‘या डोसचे वेळापत्रक 8 जानेवारी रोजी प्रसिद्ध केले जाईल. ऑनलाइन अपॉइंटमेंटची सुविधाही सुरू झाली आहे. लसीकरण केंद्राला (vaccination centre) भेट देऊन, अपॉइंटमेंट घेतल्यानंतर, तुम्ही 10 जानेवारीपासून डोस घेऊ शकता.

केंद्र सरकारने यापूर्वीच सांगितले आहे की, प्रिकॉशन (बूस्टर) डोस याअगोदर घेतलेल्या लसीचाच देण्यात येणार आहे.

बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मीडिया ब्रीफिंग दरम्यान, नीती आयोगाचे डॉ. व्हीके पॉल म्हणाले होते, ‘कोविड-19 लसीचा प्रिकॉशन डोस हा पूर्वी देण्यात आलेल्या लसीचाच असेल. ज्यांना Covaxin मिळाले आहे त्यांना Covaxin दिले जाईल, ज्यांनी Covashield चे पहिले दोन डोस घेतले असतील त्यांना Covashield दिले जाईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here