Board Exams 2022: 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निकाल

0

दि.23: Board Exams 2022: 10वी आणि 12वी बोर्डाच्या ऑफलाइन परीक्षांबाबत (10th-12th Board Exams) सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने 10वी-12वी बोर्ड परीक्षा ऑनलाइन (no online board exams) करण्यास नकार दिला आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने सांगितले की, अधिकाऱ्यांनी परीक्षा सुरू ठेवाव्यात. या प्रकरणात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सुनावणीदरम्यान खंडपीठाने याचिकाकर्त्याला फटकारले की, ‘अशा याचिकांवर सुनावणी केल्याने व्यवस्थेत आणखी गोंधळ निर्माण होतो. गेल्या वेळचा निकाल आदर्श असू शकत नाही, अशा याचिकांमुळे विद्यार्थ्यांना खोटी आशा निर्माण होते आणि संभ्रम निर्माण होतो, अशा याचिकांमुळे त्यांची दिशाभूल होईल. तुमची याचिका विचारात घेणे म्हणजे अधिक संभ्रम निर्माण करणे होय.

न्यायमूर्ती एएम खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘ही प्री-मॅच्युअर याचिका आहे. अधिकारी आधीच तारखा आणि इतर व्यवस्था अंतिम करण्याचे काम करत आहेत. त्यांना अंतिम स्वरूप दिल्यानंतर काही अडचण आल्यास संबंधित पक्ष अधिकाऱ्यांकडे संपर्क साधू शकतो.

न्यायालयाने सांगितले की, ‘तुम्हाला जे काही म्हणायचे आहे, ते प्राधिकरणाला जाऊन सांगा. पीआयएलचा हा बेजबाबदार गैरवापर आहे. लोकही कसल्या याचिका दाखल करतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here