अक्कलकोट,दि.1: श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमुळे अक्कलकोटला येण्याची नेहमीच आतुरता असते. त्यामुळे आज सहकुटुंब स्वामी दर्शनाला येवून स्वामींचे दर्शन घेऊन धन्य झालो आहे. आज सहकुटुंब स्वामी दर्शनामुळे आपण सुखावलो असल्याचे मनोगत प्रसिद्ध मराठी गायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांनी व्यक्त केले.
त्यांनी नुकतेच सहकुटुंब येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे (Mahesh Ingale) यांनी आनंदर शिंदे (Anand Shinde) व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.
यावेळी बोलताना आनंद शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक उत्तम गायकवाड, तुषार गायकवाड, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, प्रसाद सोनार, चंद्रकांत कवटगी, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.