BJP Shared Video: विरोधकांच्या संयुक्त बैठकीनंतर भाजपाने व्हिडिओ केला शेअर

0

मुंबई,दि.२३: BJP Shared Video: विरोधकांच्या संयुक्त बैठकीनंतर भाजपाने सिंहाचा व्हिडिओ शेअर केला आहे. भाजपाविरोधी ऐक्य दर्शवण्याकरता संयुक्त विरोधी पक्षांची आज बैठक पार पडली. या बैठकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण या बैठकीत देशभरातील २० हून जास्त विरोधी पक्षातील नेते उपस्थित राहिले होते. ही बैठक संपल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तसंच, पुढची बैठक शिमल्यात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

भाजपने शेअर केला व्हिडिओ | BJP Shared Video

देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची आज पाटना येथे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. मोदी सरकारला आणि भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुट केली असून आपापसातील मतभेद बाजुला ठेऊन सर्वांनी एकत्र येण्याचा विचार मांडला. देशातील ११ विरोधी पक्षांनी या बैठकीला हजेरी लावत आपलं समर्थन दिलं. या बैठकीनंतर आता भाजपाकडून पलटवार करण्यात येत आहे. भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीवर भाष्य करताना, ही मोदी हटाओ बैठक नसून परिवार बचाओ बैठक असल्याचा टोला त्यांनी लगावला होता. तर, भाजपने एक व्हिडिओ शेअर करत या बैठकीवर टीका केली आहे.

“ही अत्यंत चांगली बैठक झाली. सर्वांनी एकत्र चालण्याची सहमती दर्शवली आहे. येत्या काळात सर्व पक्षीयांची आणखी एक बैठक होणार आहे. पुढच्या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार आहे. एकत्र निवडणूक लढवण्याची सहमती आजच्या बैठकीत झाली आहे”, असं नितीश कुमार म्हणाले. या बैठकीवर भाजपने टीका केली आहे. 

काय आहे व्हिडीओत?

भाजपच्या महाराष्ट्र ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये मोदींचा आवाज असून एक अकेला कितनों को भारी… असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असल्याचं ऐकू येतंय. याशिवाय व्हिडिओत एका सिंहावर अनेक कोल्हे हल्ला करत असून तो सिंह सर्वांना परतवून लावत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. भेड के हाहाकार के बदले शेर कि एक दहाड है!, असं कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आलंय.

देवेंद्र फडणवीसांची टीका

देशात सध्या मोदी विरूद्ध विरोधक असा संघर्ष हळूहळू अधिक तीव्र होत आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी अमेरिकेत आहेत तर दुसरीकडे आज बिहारच्या पाटण्यामध्ये सुमारे १५ विरोधी पक्षांनी एकत्रित मेळावा घेतला आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुखे उद्धव ठाकरे यांनीही सहभाग नोंदवला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सरकारला हटवण्यासाठी आम्ही सारे लोक एकत्र आलो आहोत, असा सूर विरोधकांनी बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना आळवला. पण अशा मेळाव्यांचा काहीही फायदा होणार नाही, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरच्या फळीतील नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सध्या सुरू असलेला हा मेळावा म्हणजे मोदी हटाव मेळावा नसून परिवार बचाव मेळावा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, उद्धव ठाकरे आणि मेहबुबा मुफ्ती एकाच मंचावर आल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले.

“पुढच्या बैठकीत अंतिम रुप घेतलं जाईल. कोण कुठून लढवणार हे या बैठकीत ठरवलं जाईल. सध्या जे शासनमध्ये आहेत ते देशहिताचं काम करत नाहीयत. ते देशाचा इतिहास बदलायला निघाले आहेत. स्वातंत्र्यांच्या लढाईलाही ते विसरतील. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे विरोधक एकजूट राहणार आहेत. राज्यातील सरकारवरून आव्हाने निर्माण झाली तर सर्व एकत्र राहणार आहेत”, असंही नितीश कुमार म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here