BJP MLA Sunil Kamble: भाजपा आमदार सुनील कांबळे यांची बिल्डरच्या फायद्यासाठी झोपडपट्टीतील नागरिकांना दमदाटी?

0

पुणे,दि.2: भाजपा आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांनी झोपडपट्टीतील नागरिकांना दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातल्या कॅन्टोन्मेंट मतदार संघातले आमदार सुनील कांबळे यांचा नागरिकांना दमदाटी करतानाच व्हिडिओ सद्या व्हायरल होतोय. पुण्यातल्या मार्केट यार्डमधील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तिथून हकलून लावण्यासाठी आमदार कांबळे आणि त्यांचे साथीदार स्थानिकांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काही स्थानीक नागरिकांना दमदाटी केल्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर झपाट्याने वायरल झाला आहे. एका खाजगी बांधकाम व्यावसायिकाला फायदा पोहोचवण्यासाठी सुनील कांबळे आणि त्यांचे काही सहकारी झोपडपट्टीमध्ये जाऊन झोपडपट्टीतील रहिवाशांना दमदाटी आणि शिवीगाळ करताना ह्या व्हिडियोमध्ये दिसत आहे. यामुळे सुनील कांबळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून येत आहे. ते वारंवार कोणत्यातरी कारणाने चर्चेत असतात.

यापूर्वी देखील आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून दमदाटी करतानाची कथित ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आमदार सुनील कांबळे यांच्याशी संबंधित वादग्रस्त व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

मिळालेल्या व्हिडीओद्वारे एका खाजगी बांधकाम व्यावसायिकाला फायदा पोहोचवण्यासाठी सुनील कांबळे आणि त्यांचे काही सहकारी झोपडपट्टीमध्ये जाऊन झोपडपट्टीतील रहिवाशांना दमदाटी आणि शिवीगाळ करताना ह्या व्हिडियोमध्ये दिसत आहे. सुनील कांबळे यांच्या सोबत असलेला एक व्यक्ती झोपडपट्टीतील रहिवाशांना मारण्यासाठी हातात लोखंडी हातोडा घेऊन धावताना देखील दिसत आहे. त्यामुळे एकूणच या सर्व प्रकारामुळे मार्केट यार्ड परिसरातील आनंदनगर झोपडपट्टी परिसरामध्ये आमदार सुनील कांबळे यांच्या विषयी मोठी दहशत निर्माण झाली आहे.

या प्रकरणात आनंद नगर झोपड पट्टीतील स्थानिक नागरिकांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे ऑनलाइन तक्रार केली आहे. स्थानिक मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये आमदारांच्या विरोधात तक्रार घेणार नाही, म्हणून नागरिकांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. राज्यात सध्या शिवसेनेचे फुटीरवादी गट एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाची यांची सत्ता आहे.

त्यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदार विरोधात पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता कारवाई करणार का ? असा प्रश्न देखील या घटनेमुळे निर्माण झाला आहे. यापूर्वी देखील आमदार सुनील कांबळे हे यांनी महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून दमदाटी करण्याचा कथित ऑडियो क्लिप सोशल मीडियावर वायरल झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आमदार सुनील कांबळे यांच्याशी संबंधित वादग्रस्त व्हिडियो पुन्हा एकदा सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here