भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच झाडल्या गोळ्या

0

मुंबई,दि.3: भाजपा आमदाराने शिवसेनेच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच 4 गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्रातील उल्हासनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट) नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. हिल लाईन पोलिस स्टेशनमधील एका वरिष्ठ पोलिस कर्मचाऱ्याच्या केबिनमध्ये हा गोळीबार झाला, जिथे दोन राजकारणी आणि त्यांचे समर्थक दीर्घकाळ चाललेल्या जमिनीच्या वादावर तक्रार दाखल करण्यासाठी जमले होते. यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी आमदाराला ताब्यात घेऊन अटक केली.

जखमी नेत्याची प्रकृती चिंताजनक

भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. या वादामुळे दोन्ही नेते व त्यांचे समर्थक हिल लाईन पोलीस ठाण्यात जमा झाले. दरम्यान, दोन गटातील वाद अधिकच वाढला नंतर पोलीस ठाण्यातील गोळीबारात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटनेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

या गोळीबारात महेश गायकवाड आणि शिंदे समर्थक राहुल पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रात्री 11 वाजता उल्हासनगर येथील मीरा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने दोन्ही नेत्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास आमदार गणपत गायकवाड यांनी महेशवर एकूण चार गोळ्या झाडल्या.

पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केल्याचं गणपत गायकवाड यांनी कबूल केलं. माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत होती. त्यामुळे माझ्यासमोर पर्याय नव्हता. पोलिसांसमोर माझ्यावर जर कुणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असं करणं गरजेचं होतं, असे गणपत गायकवाड यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here