भाजपा आमदाराने केली राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यास मारहाण

0

पुणे,दि.5: भाजपा आमदाराने राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यास मारहाण केली आहे. आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली आहे. पुणे येथे ही घटना घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन केले. कार्यक्रमास हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात मारहाणीची घटना घडली. आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार यांच्या उपस्थितीत ही घटना घडली. tv9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.

राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जितेंद्र सुरेश सातव यांना भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केली. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्ड उद्घाटन कार्यक्रमात ही घटना घडली. यामुळे कार्यक्रमस्थळी सर्वच जण आवाक झाले.

सातव यांना मारहाण का झाली? याचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु या प्रकारामुळे अजित पवार नाराज झालेले दिसत होते. महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) सत्तेत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here