सोलापूर,दि.9: मध्य प्रदेशातील अशोकनगरमध्ये विकास यात्रा काढत असताना, मंत्री ब्रिजेंद्र सिंह यादव (MP Minister Brijendra Singh Yadav) यांचे स्वागत करताना एका उपद्रवी तत्वाने त्यांच्या अंगाला करंजाच्या बिया किंवा पावडर लावली. त्यामुळे मंत्र्यांच्या अंगाला खाज सुटू लागली. खाजेने त्रस्त असलेल्या मंत्र्याने गावात अंघोळ करून कपडे बदलले, मग कुठेतरी त्यांना आराम मिळाला. या प्रकरणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा Deepak Kesarkar दीपक केसरकरांचे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य
नेमके काय घडले? | MP Minister Brijendra Singh Yadav
बृजेंद्र सिंह (Brijendra Singh Yadav) यांच्यावर काही व्यक्तींनी खोडसाळपणा करत खाजकुलीची पावडर टाकली. त्यामुळे मंत्रिमहोदयांना भर कार्यक्रमात अडचणींचा सामना करावा लागला. मध्य प्रदेशमधील अशोकनगर येथे स्वागत करताना काही मंडळींनी गुपचूप मंत्री महोदयांना खाजकुलीची पावडर लावली. त्यामुळे मंत्रिमहोदय शरीरावर येत असलेल्या खाजेने हैराण झाले. ही खाज इतकी असह्य झाली की, मंत्र्यांनी कार्यक्रम बाजूला टाकून गावातच स्नान केले आणि कपडे बदलले. त्यानंतर त्यांना काहीसे बरे वाटले. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भाजपाच्या विकास यात्रेचा एक भाग म्हणून… | Brijendra Singh Yadav
मध्य प्रदेश सरकारमधील राज्यमंत्री आणि मुंगवलीचे आमदार ब्रिजेंद्र सिंह यादव भाजपच्या विकास यात्रेचा एक भाग म्हणून विधानसभा मतदारसंघातील गावोगावी जाऊन लोकांच्या भेटी घेत आहेत. सरकारच्या योजनांची माहिती लोकांना देण्याबरोबरच पायाभरणी आणि भूमिपूजन कार्यक्रमही मंत्री करत आहेत.
देवर्छी गावात गेले असताना घडली घटना | MP News
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार बृजेंद्र सिंह मुंगवली विधानसभा मतदारसंघातील देवर्छी गावात गेले असताना ही घटना घडली. ते देवर्छी गावात आले असताना काही खोडसाळ प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर करंजाची (खाजकुलीची) पावडर टाकली. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. त्यात करंजाची पावडर टाकण्यात आल्यानंतर मंत्रिमहोदर गावात आंघोळ करताना दिसत आहेत. तसेच त्यामध्ये कुणीतरी अंगावर करंजाची पावडर टाकली असे ते सांगत असल्याचे ऐकू येत आहे.