Sudhir Mungantiwar: भाजपच्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस बाबत केलं मोठं विधानं

0

मुंबई,दि.28: भाजपाचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवा (Sudhir Mungantiwar) यांनी राष्ट्रवादी (NCP) पक्षाबाबत मोठं विधानं केलं आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले. भारतीय जनता पार्टीने (BJP) सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी बाकावर बसावे लागले. राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले आहे. त्यामुळे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांचं मी पुन्हा येईनचं स्वप्न भंगलं. मात्र, भाजपकडून सातत्याने हे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येत भाजप 2014 मध्येच सरकार स्थापन करणार होतं, हे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आता म्हटले आहे.  

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची चर्चा 2017 मध्येच झाली होती. मंत्रिपदंही ठरली होती. मात्र, शिवसेनेसोबत आमचं जमणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीनं सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला, असं गौप्यस्फोट भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला. तर, दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनीही भाजपने राष्ट्रवादीसोबतच युती करायला हवी होती, आता पश्चाताप होत आहे, असे म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

सन 2014 मध्ये आमच्यासोबत राष्ट्रवादीचा अदृश्य हात होता. पण, आम्ही शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवलं. राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवण्यावर चर्चादेखील झाली. मात्र, शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत सरकार बनवावं हे आमचं मत नव्हतं. म्हणून, आशिष शेलार जे म्हणाले त्यात तथ्य आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. तसेच, राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक झाली आणि आता त्याचं प्रायश्चित्त आम्ही भोगतोय, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे दररोज राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर टिकेची झोड उठवणारे आजही राष्ट्रवादीसोबत नसल्याची खंत बोलून दाखवत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here