Piyush Goyal | भाजपा नेते पियुष गोयल यांनी मागितली माफी 

0

मुंबई,दि.१: भाजपा नेते पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली आहे. गोयल यांनी ट्विट करत माफी मागितली आहे. पियुष गोयल यांनी पीटीआयला मुलाखत दिली. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गोयल यांनी प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे असा दावा केला होता. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने (अजित पवार गट) काल (दि.३१) सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. सुनेत्रा पवार यांनी काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 

पियूष गोयल यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या संभावित विलीनीकरणाबाबत विचारलं असता सांगितलं की, “मला स्वत:ला तसं होताना दिसत नाही. मला वाटत नाही तसं काही होईल. राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचा भाग म्हणून खूप चांगली कामगिरी केली. नेतृत्व आधी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांकडे आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड कऱण्यात आली आहे. शरद पवारांनी लोकांचा विश्वास आणि मतं गमावला असल्याने त्यांना युतीसाठी आमंत्रण मिळेल असं मला वाटत नाही.”

पियुष गोयल यांनी मागितली माफी 

“एका ज्येष्ठ पत्रकाराने मला चुकीची माहिती दिली की श्री. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. माहितीची पडताळणी न करता मी माध्यमांना काही विधाने केली, परंतु नंतर मला कळले की ती माहिती चुकीची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. मी दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल माफी मागतो,” असं त्यांनी म्हटलं आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here