BJP Karnataka: भाजपाने कर्नाटकात अमेरिका म़ॉडेल राबविण्यास केली सुरुवात

0

सोलापूर,दि.१: BJP Karnataka: भाजपाने कर्नाटकात अमेरिका म़ॉडेल राबविण्यास सुरुवात केली आहे. ओपिनियन पोल्सची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, २२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होताच या निवडणुकीबाबत अंदाज वर्तवणारे ओपिनियन पोल्स समोर येऊ लागले आहेत. त्यात एबीपी न्यूज सी व्होटरने केलेल्या ओपिनियन पोलमधून कर्नाटकमधील निवडणुकीच्या निकालाबाबत धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार कर्नाटकमध्ये भाजपाचा पराभव होणार असून, काँग्रेस विजयी होईल, असे या पोलमध्ये म्हटले आहे. या ओपिनियन पोलसह इतर ओपिनियन पोलमधूनही कर्नाटकात भाजपाच्या पराभवाचं भाकित वर्तवण्यात आलं आहे.

अमेरिका म़ॉडेल राबविण्यास सुरुवात | BJP Karnataka

ओपिनिअन पोलने भाजपाची झोप उडविली आहे. काँग्रेसने तर त्यापूर्वीच आपली पहिली यादी जाहीर केली होती. असे असताना आता भाजपाने निवडणुकीपूर्वीच्या ओपिनिअन पोलवर काम करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी भाजपाने कर्नाटकात अमेरिका म़ॉडेल राबविण्यास सुरुवात केली आहे. 

काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दुसरी यादी बनविताना कस लागत आहे. परंतू, भाजपाला ओपिनिअन पोलनी हादरे बसले आहेत. काँग्रेस-निजद सरकार पाडून भाजपाने सत्ता हिसकावली असली तरी ओपिनिअन पोलनुसार जनमत भाजपाच्या विरोधात गेले आहे. यामुळे सत्ता असूनही भाजपा पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. तसे कर्नाटक राज्य हे नेहमी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणारे राज्य आहे. परंतू, गेल्या वेळी काँग्रेस सत्तेत होती, त्यांना कमी जागा मिळाल्या होत्या. तर निजदला काही जागा मिळाल्या होत्या. हे संख्याबळ सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे असल्याने त्यांनी भाजपविरोधात सत्ता स्थापन केली होती. भाजपाने ही सत्ता उलथवून टाकली होती.

आता काँग्रेसचा विजय डोळ्यासमोर दिसत असल्याने भाजपाने अमेरिका म़ॉडेल आणले आहे. अनेक जागांवर भाजपाला काँग्रेस आणि निजदकडून टक्कर मिळत आहे. यामुळे भाजपाने उमेदवार निवडताना त्या त्या मतदारसंघात भाजपाच्या सदस्यांचे मतदान घेण्यास सुरुवात केली आहे. २२४ जागांवर प्राथमिक चर्चा झाली आहे. या जागांवर कोणता उमेदवार काँग्रेसला टक्कर देऊ शकतो, याबाबत चाचपणी सुरु असून इच्छुकांच्या नावावर मतदान घेतले आहे.

प्रत्येक मतदार संघात असे तीन संभाव्य उमेदवार निवडले जाणार आहेत. त्या मतदानावर व तुल्यबळ लढतीवर लक्ष केंद्रीत करत जाती-पातीचे समीकरण जुळवत भाजपा आपले उमेदवार जाहीर करणार आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडताना जसे मतदान होते, तसे भाजपाने आपल्या स्तरावर घेतले आहे. 

योजना काय होती?

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन वरिष्ठ सदस्यांना मतदानाची देखरेख ठेवण्यासाठी पर्यवेक्षक म्हणून निवडण्यात आले होते. एका मतदारसंघासाठी सरासरी १५० सदस्यांनी मतदान केले. मंडळ समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, सात मोर्चा आणि विंगच्या संघटनांचे हे सदस्य होते. यामध्ये महिला, एससी, एसटी, ओबीसी, युवा, शेतकरी, अल्पसंख्यांक सदस्यांना मतदानाची संधी देण्यात आली होती. 

भाजपाने अंतर्गत अशाप्रकारे मतदान प्रक्रिया राबविल्याने भाजपाचे विद्यमान आमदार नाराज झाले आहेत. या आमदारांना तिकीट मिळेल की नवा चेहरा दिला जाईल याबाबत ते साशंक आहेत. पक्षाने केवळ जिंकण्याची क्षमता असलेल्या आमदारांना चिंता करण्याची गरज नाही, एवढेच संकेत दिल्याने सर्वांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here