दि.१०: UP Assembly Election Results 2022: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी गुरुवारी सकाळी सुरू होणार असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. यामधील सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे असणार आहे. एग्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान उत्तर प्रदेश वगळता चारही राज्यांमध्ये काँग्रेसने ज्येष्ठ नेत्यांना ‘तैनात’ केले आहे.
१८० जागांचे कल हाती; भाजपचे शतक, १०९ जागांसह आघाडी, सपा मागे पडली
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, १८० जागांसाठी कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप १०९ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा ६८ जागा, बसप, ०२, अन्य ०१ वर आहेत. काँग्रेस पक्षाला अजूनही खाते उघडता आले नाही.
उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र यावेळी भाजपासमोर गेल्या निवडणुकीतील संख्याबळ राखण्याचं आव्हान आहे.