मुंबई,दि.26: भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी रविवारी (दि.20) जाहीर केली होती. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली होती. भाजपाने पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांना संधी दिला आहे.
भाजपाच्या पहिल्या यादीत सोलापूर शहर उत्तरमधून आमदार विजयकुमार देशमुख यांना तर सोलापूर दक्षिण मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता भाजपाच्या दुसऱ्या यादीत शहर मध्यमधून देवेंद्र कोठे यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत 22 जणांना स्थान देण्यात आलं आहे. जतमधून गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या धीरज देशमुख यांच्याविरोधात भाजपने रमेश कराड यांना मैदानात उतरवल्याने ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. तसंच खडकवासला मतदारसंघाबाबतचाही सस्पेन्स संपवत विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
भाजपा दुसरी यादी
सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे
पंढरपूर – समाधान आवताडे
धुळे ग्रामीण – राम भदाणे
मलकापूर – चैनसुख संचेती
अकोट – प्रकाश भारसाकळे
अकोला पश्चिम – विजय अग्रवाल
वाशिम – श्याम खोडे
मेळघाट – केवळराम काळे
गडचिरोली – मिलींद नरोटे
राजूरा – देवराव भोंगले
ब्रम्हपुरी – कृष्णलाल सहारे
वरोरा – करण देवतळे
नाशिक मध्य – देवयानी फरांदे
विक्रमगढ – हरिश्चंद्र भोये
उल्हासनगर – कुमार आयलानी
पेण – रवींद्र पाटील
खडकवासला – भिमराव तापकीर
पुणे – सुनील कांबळे
कसबा पेठ – हेमंत रासने
लातूर ग्रामीण – रमेश कराड
शिराळा – सत्यजित देशमुख
जत – गोपीचंद पडळकर