लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल विजयी

0

सूरत,दि.22: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आपले खाते उघडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे मुकेश दलाल निवडून येणार हे निश्चित मानले जात आहे. वास्तविक, काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. सुरत लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवाराचे उमेदवारी अर्ज भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून फेटाळण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे गुजरात युनिट प्रमुख शक्तीसिंह गोहिल यांनी रविवारी केला.

सुरत लोकसभा मतदारसंघात अपक्षांसह 8 पैकी 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. त्यानंतर बहुजन समाज पक्षाचे उमेदवार प्यारेलाल बेपत्ता झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

काँग्रेस उमेदवाराचे अर्ज रद्द

निवडणूक अधिकारी सौरभ पारधी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, कुंभणी आणि पडसाळ यांनी सादर केलेले चार नामनिर्देशन अर्ज प्रस्तावकांच्या स्वाक्षऱ्यांमध्ये प्रथमदर्शनी तफावत आढळून आल्याने फेटाळण्यात आले. या सह्या खऱ्या वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. आदेशात म्हटले आहे की, समर्थकांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात फॉर्मवर स्वत: सह्या केल्या नसल्याचे म्हटले आहे. 

या घडामोडीला दुजोरा देताना काँग्रेसचे वकील बाबू मांगुकिया म्हणाले, “नीलेश कुंभाणी आणि सुरेश पडसाळ यांचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले आहेत. चार प्रस्तावकांनी फॉर्मवर आपल्या सह्या नसल्याचे सांगितले. आता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, बिनविरोध निवड झालेले मुकेश दलाल हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. सूरतच्या जागेवरून प्रथमच एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. इतर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे दलाल यांचा विजय निश्चित झाला. निवडणूक आयोगाकडून दलाल यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here