भविष्यात स्मार्टफोन खिशात ठेवून फिरण्याची गरज भासणार नसल्याचं मायक्रोसॉफ्टचे को फाऊंडर बिल गेट्स यांचं मत

0

दि.17: भविष्यात स्मार्टफोन खिशात ठेवून फिरण्याची गरज भासणार नसल्याचं मायक्रोसॉफ्टचे को फाऊंडर बिल गेट्स यांनी मत व्यक्त केले आहे. स्मार्टफोनचं युग 2030 पर्यंत संपणार असून भविष्यातील तंत्रज्ञान मायक्रोसॉफ्टचे को फाऊंडर बिल गेट्स यांनी सांगितले आहे. भविष्यात स्मार्टफोन खिशात ठेवून फिरण्याची गरज भासणार नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केले. स्मार्टफोन तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. अवघ्या काही वर्षात स्मार्टफोनमध्ये बदल झालेला पाहायला मिळत आहे.

आज, स्मार्टफोनमध्ये हाय-टेक कॅमेऱ्यांपासून ते सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि फास्ट चार्जिंग ते वायरलेस चार्जिंगपर्यंत प्रत्येक आवश्यक फीचर्सचा समावेश केला जात आहे. हे युग इथेच थांबणार नाही. तंत्रज्ञान क्षेत्र खूप वेगाने विकसित होत आहे आणि स्मार्टफोन कंपन्या त्यात सुधारणा करण्यासाठी सतत काम करत आहेत. भविष्यात स्मार्टफोनच्या स्वरूपाबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, येणाऱ्या काळात स्मार्टफोन्स इतके हायटेक बनतील की ते गायबच होतील.

वर्षाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टचे को फाऊंडर बिल गेट्स यांनी स्मार्टफोन्सच्या तंत्रज्ञानाविषयी अंदाज वर्तवला होता. यामुळे स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बदलेल. त्यांचा असा विश्वास होता की इलेक्ट्रॉनिक टॅटू स्मार्टफोनची जागा घेऊ शकतात. म्हणजेच भविष्यात स्मार्टफोनऐवजी इलेक्ट्रॉनिक टॅटूचा वापर केला जाऊ शकतो.

स्मार्टफोन असा असेल

बिल गेट्स यांच्या म्हणण्यानुसार, भविष्यात स्मार्टफोनला खिशात घेऊन फिरण्याची गरज भासणार नाही, तर स्मार्टफोन आपल्या शरीरात इंटिग्रेट केला जाईल. म्हणजेच, स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक टॅटूमध्ये बदलेल. हे इलेक्ट्रॉनिक टॅटू केवळ लहान आकाराचे चिप असतील आणि ते मानवी शरीरात बसवले जातील.

नोकियानंही केली होती भविष्यवाणी

नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क यांनीही भविष्यातील स्मार्टफोनवर आपले मत मांडले होते. 2030 पर्यंत, स्मार्टफोनच्या सामान्य इंटरफेसमध्ये मोठा बदल दिसून येईल असे त्यांचे म्हणणे होते. या वेळेपर्यंत 6G तंत्रज्ञान आलेले असेल आणि स्मार्टफोनऐवजी स्मार्ट चष्मा किंवा अन्य डिव्हाईसचा वापर केला जाईल. 2030 पर्यंत स्मार्टफोनशी संबंधित अनेक गोष्टी थेट शरीरात इंटिग्रेट केल्या जाऊ लागतील, असेही पेक्का यांचे म्हणणे आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here