सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) शनिवारी (दि.3) सोलापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात भाजपातून राष्ट्रवादी शरद पवार गटात आलेले बिज्जू प्रधाने (Bijju Pradhane), सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी यांच्यासह अनेकांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, तौफिक शेख यांचा प्रवेश लांबणीवर गेल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर (Solapur) शहर भारतीय जनता (BJP) पार्टीचे सरचिटणीस बिज्जू प्रधाने (Bijju Pradhane) यांनी 18 फेब्रुवारी 2022 ला राजीनामा दिला होता. बिज्जू प्रधाने यांनी तत्कालिन भाजपा शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांना पत्र लिहून राजीनामा दिला होता.
बिज्जू प्रधाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी पक्षात जुलै 2023 फूट पडली. अजित पवारांनी बंड केल्यामुळे पक्षात फूट पडली. बिज्जू प्रधाने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी पर्देशाध्यक्ष सुनील तटकरे, सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार आदी उपस्थित होते.
बिज्जू प्रधाने यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला आहे. प्रधाने यांच्या पक्षप्रवेशाने अजित पवार गटाची ताकत वाढणार आहे. बिज्जू प्रधाने यांचे (शरद पवार गट) नाव राष्ट्रवादी शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत होते.