पाटणा,दि.26: Bihar Teacher Fight Viral Video: शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. शाळेत उत्तम संस्कार करण्याचे काम शिक्षक करतात. बिहारची राजधानी पाटणामधील एका बिहारची राजधानी पाटणा येथील बिहता येथील सरकारी शाळेत (School) महिला मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात (Teacher Fight) झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे.
Bihar Teacher Fight Video | शाळेची खिडकी लावण्यावरून दोन शिक्षकांमध्ये वाद
शाळेची खिडकी लावण्यावरून दोन शिक्षकांमध्ये वाद सुरू झाला. हे प्रकरण इतकं तापलं की लगेचच दोन्ही शिक्षिका एकमेकांशी भांडू लागल्या. हळूहळू हा वाद वाढला आणि शाळेचा परिसर कुस्तीचा आखाडा बनला. यादरम्यान त्या दोघींमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. एकमेकींना लाथा-बुक्के मारले. त्यांच्या मारहाणीदरम्यान इतर लोकांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. तर काही जण ही घटना मोबाईलमध्ये कॅप्चर करत होते.
हे प्रकरण बिहारमधील बिहटा प्रखंड येथील सरकारी शाळेचा आहे. आपापसातील वादावरून शाळेच्या मुख्याध्यापिका कांती कुमारी आणि शिक्षिका अनिता कुमारी यांच्या तुंबळ हाणामारी झाली. हा वाद इतका वाढला होता की दोघांनी एकमेकांना लाथा, बुक्के, चपलेनंही मारलं. दोघी एकमेकींचे केस ओढू लागल्या. यादरम्यान आणखी एका महिलेनेही कांती यांना चप्पल आणि काठीने मारहाण केली. नंतर काही लोकांनी मध्यस्थी करून त्यांची सुटका केली. हाणामारीदरम्यान कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
याप्रकरणी गटशिक्षण अधिकारी नवेश कुमार यांनी सांगितले की, हा दोन शिक्षकांमधील वैयक्तिक वाद आहे. याबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील कारवाई केली जाईल.