दि.6: ऐन दिवाळीच्या सणात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडणार आहे. आता घरगुती वापराच्या (LPG Cylinder) सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्याचवेळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. ऑइल मार्केटिंग कॉसने घरगुती एलपीजी ( LPG) सिलिंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ केली आहे.
तेल कंपन्यांनी अनुदानित 14.2 किलो सिलिंडरच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ केली आहे. (15 rupees more expensive in the price of non-subsidized cylinder) यानंतर, आता दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 884.50 रुपयांवरून 899.50 रुपये प्रति सिलिंडर झाला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी व्यावसायासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरचे दर 43 रुपयांनी वाढले होते. आता दरवाढ करण्यात आल्याने घरगुती गॅस सिलिंडरचा प्रवास एक हजार रुपयांच्या दिशेने सुरु झाली आहे. मात्र, एक ऑक्टोबरला पेट्रोलियम कंपन्यांनी नवे दर जाहीर केले. त्यामध्ये घरगुती सिलिंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले. तर व्यावसायिक सिलिंडरचे 43 रुपयांनी वाढविण्यात आले. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरपोटी 1881.23 ऐवजी 1924.23 रुपये भरावे लागणार आहेत. याचा थेट फटका हॉटेल-रेस्टॉरंटचालकांना बसणार आहे.