मुंबई,दि.22: sanjay raut news: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी ट्विट करत विधानसभा बरखास्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) बंडखोरी केल्याने राज्यात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपा बरोबर शिवसेनेने सरकार स्थापन करावे अशी भूमिका घेत बंड पुकारले आहे.
राज्यातील उद्भवलेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे राजीनामा देऊन राज्यपालांना सरकार बरखास्त करण्याची शिफारस करू शकतात. असे झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्यानंतर निवडणुका होतील किंवा ज्या पक्षाला बहुमत आहे तो पक्ष सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाबत मोठं विधानं केलं होते. मंत्री एकनाथ शिंदे यांनी कालपासून पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. यासर्व घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं होते. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, सत्ता पुन्हा मिळवता येते, पण पक्षाचीही प्रतिष्ठा असते, असं संजय राऊत म्हणाले होते. तसेच, एकनाथ शिंदे यांच्याशी आज सकाळीच फोनवरुन तासभर चर्चा झाली. झालेल्या चर्चेती माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देण्यात आल्याचंही संजय राऊत म्हणाले.