“अपेक्षित नाही अशी लोक भाजपामध्ये प्रवेश करताना दिसतील” भाजपा नेत्याचा मोठा दावा

0

जळगाव,दि.14: “अपेक्षित नाही अशी लोक भाजपामध्ये प्रवेश करताना दिसतील”असं मोठा दावा भाजपा नेत्याने केला आहे. आज (दि.14) काँग्रेस नेते माजी खासदार मिलिंद देवरासह 10 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. देवरा यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच महायुतीच्या भाजपा, शिंदे गट आणि अजितदादा गट या तीनही पक्षांचा एकत्रितरित्या मेळावा पार पडला.

जळगावात माध्यमांशी संवाद साधताना भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला. राज्यात आणखी प्रचंड मोठे राजकीय भूकंप होणार आहेत, फक्त 15 दिवस थांबा. तुम्हाला वाटणारही नाही, असे नेते भाजपामध्ये येणार आहेत, असा दावा महाजन यांनी केला आहे. महाजन यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. Tv9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

गिरीश महाजन यांनी आगामी काळात आणखी मोठे राजकीय प्रवेश होण्याचे संकेत दिले आहेत. महाजन म्हणाले, ‘राजकारणात मोठे मोठे भूकंप होतील, असे मी तुम्हाला सांगितले होते. त्याप्रमाणे आज काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. अजूनही मोठे राजकीय भूकंप होतील.’

‘पुढच्या 15 दिवसात आपल्याला अपेक्षित नाही अशी लोक भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतील. मिलिंद देवरा यांचा आज शिवसेनेत प्रवेश झाला आहे.’ असे वक्तव्य महाजन यांनी केले आहे. महाजन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला येणाऱ्या काळात राजकीय धक्के बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here