Raj Thackeray Rally: औरगांबाद येथील राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा भीम आर्मीचा इशारा

0

औरंगाबाद,दि.२९: Raj Thackeray Rally: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेला सशर्त परवानगी मिळाली आहे. येत्या १ मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील प्रस्तावित सभेला परवानगी मिळाली आहे. काल सायंकाळी पोलिसांनी एकूण १६ अटी घालत राज ठाकरेंच्या परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करू नये, असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद पोलिसांकडून सभेला परवानी मिळाल्याने सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, त्याच दरम्यान भीम आर्मीने (Bhim Army) राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.

भीम आर्मीकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे होणारी जाहीर सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलीसानी दिलेल्या सूचनांचे, अटींचे पालन न केल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीकडून देण्यात आला आहे. राज ठाकरे यांना पोलीस प्रशासनाने १६ अटी दिल्या आहे. त्या अटींचे उल्लंघन झाल्यास भीम आर्मीकडून महापुरुषांच्या नावाच्या घोषणा सभेच्या ठिकाणी दिल्या जातील अशी माहिती भीम आर्मीचे नेते अशोक कांबळे यांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here