सोलापूर,दि.16: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आयोजित उत्सव मिरवणुक सोलापूरात (Solapur) दि.17 रोजी काढण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने सशर्त परवानगी दिली आहे. मिरवणुकीत डॉल्बी साऊंड सिस्टिम लावण्यावरून अनेकजण आग्रही होते. याकरिता पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्याबरोबर आंबेडकरी नेत्यांची बैठक झाली. आयुक्त हरीश बैजल यांच्याबरोबर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फोनवरून संपर्क साधून चर्चा केली होती.
रविवार दि.17 रोजी मिरवणुक काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपायुक्त बापूसाहेब बांगर यांच्या सहीने शुक्रवारी दुपारी पाचच्या दरम्यान पत्र काढून मिरवणुकीचा परवाना दिला आहे.
मिरवणुकीस पोलिस आयुक्तालयाने सशर्त परवानगी दिली आहे. दिवसा आणि रात्री आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे. त्यामध्ये दिवसात 75 डेसिबल आणि रात्री 70 डेसिबल इतका आवाज मर्यादेत राहील अशा सूचना पोलिस प्रशासनाने केल्या आहेत.
17 एप्रिल रोजी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुकीला परवानगी असेल, 12 नंतर सर्व ध्वनिक्षेपक बंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जयंती उत्सव विश्वस्त समितीचे राजा सरवदे राजा इंगळे राहुल सरवदे सुबोध वाघमोडे तसेच मध्यवर्ती महामंडळाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पोलीस आयुक्तांकडे झाली. पोलीस आयुक्तांच्या या बैठकीचा निर्णय गुलदस्त्यातच आहे.
Home सोलापूर वार्ता Solapur: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीस पोलीस प्रशासनाने दिली सशर्त परवानगी