PM नरेंद्र मोदींवरील ‘BBC’चा माहितीपट यूट्यूब आणि ट्विटरवर ब्लॉक

0

नवी दिल्ली,दि.२१: BBC Documentary On Modi: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार PM नरेंद्र मोदींवरील (Narendra Modi) ‘बीबीसी’चा माहितीपट यूट्यूब (Youtube) आणि ट्विटरवर ब्लॉक करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी ‘बीबीसी’ने अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट (BBC Documentary On Gujarat Riots) प्रदर्शित केला आहे. बीबीसीने ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाच्या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यामध्ये गोधरा हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेल्या दंगली या घटनांशी संबंधित राजकीय नेते, पत्रकार आणि पीडित लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच गुजरात दंगलीमध्ये अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले, अशाप्रकारचं चित्रण या माहितीपटातून करण्यात आलं आहे.

हेही वाचा Solapur: आमदार सचिन कल्याणशेट्टी, रोहन देशमुखसह १० जणांना जामीन मंजूर

भारतात उमटले पडसाद… | BBC Documentary On Modi

‘बीबीसी’ने हा माहितीपट प्रदर्शित करताच याचे भारतात पडसाद उमटले आहेत. केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतला. यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार, बीबीसीचा संबंधित माहितीपट यूट्यूब आणि ट्विटरवर ब्लॉक करण्यात आला आहे. ‘एएनआय’ने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

BBC Documentary On Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करत निर्देश जारी | BBC Documentary On Gujarat Riots

यूट्यूबवरील व्हिडीओंसह केंद्र सरकारने ट्विटरला संबंधित यूट्यूब व्हिडीओच्या लिंक असलेले ५० हून अधिक ट्वीट ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव यांनी आयटी नियम, २०२१ अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करत निर्देश जारी केले. यानंतर यूट्यूब आणि ट्विटरने सरकारच्या आदेशाचे पालन केले.

बीबीसीने २००२ च्या गुजरात दंगली आणि पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दंगलीच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी दोन भागांमध्ये माहितीपट (डॉक्युमेंट्री) प्रसारित केली. हा माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर यावर आक्षेप घेण्यात आला असून हा व्हिडीओ निवडक प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला. हा माहितीपट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील ‘प्रोपगंडा’ असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here