आमदार बबनदादा शिंदे भाजपात जाणार?; बबनराव शिंदे यांनी सांगितले

0

दि.25: राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या संदर्भात झी 24 ने वृत्त दिले आहे. यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते राजन पाटील (Rajan Patil) भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आमचं ठरलय म्हणत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आहेत. या दिल्ली दौऱ्यावेळी शिंदे फडणवीसांनी शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील हे फडणवीसांच्या भेटीला पोहचले आहेत. दिल्लीत या दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

बबनदादा शिंदे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यानंतर आता शिंदे फडणवीसांच्या भेटीला गेल्यानं ते भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. झी 24 तासनं याबाबत वृत्त दिले आहे. मतदारसंघात शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या दिशेने जाण्याचे संकेत दिले जात होते. जय श्री राम असा संदेश कार्यकर्ते एकमेकांना देत होते. परंतु बबनदादा शिंदे यांनी यावर थेट भाष्य करणं टाळलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार बबनदादा शिंदे यांनी रविवारी रात्री पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. परंतु या भेटीत काही सकारात्मक न घडल्याची माहिती आहे. बबनदादा शिंदे हे आमदार आहेत त्यामुळे जर अशाप्रकारे त्यांनी भाजपात अधिकृत प्रवेश घेतला तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. 

आमदार बबनदादा शिंदे यांनी वृत्तवाहिनीला बोलताना या वृत्ताचे खंडन केले आहे. मी भाजपामध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, मी राष्ट्रवादीतच आहे. दिल्लीला कामानिमित्त गेलो होतो, असे बबनराव शिंदे म्हणाले. मात्र बबनदादा शिंदे यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here