Avantika Express Woman Attacked  | रुद्राक्ष माळेवरून अवंतिका एक्सप्रेसमध्ये महिलेवर हल्ला 

0
Avantika Express Woman Attacked

मुंबई,दि.५: Woman attacked in Avantika Express | रुद्राक्ष माळेवरून अवंतिका एक्सप्रेसमध्ये  (Avantika Express) महिलेवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. अॅड. शीतल भोसले यांच्यावर रुद्राक्षाची माळ जपते म्हणून ठाण्यातील मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये मुस्लिम जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.

ॲड. भोसले या मुंबईहून इंदौरला जात होत्या. अवंतिका एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना पालघर स्टेशनपासून गाडी पुढे गेल्यानंतर गाडीत वाद झाला. आप यह रुद्राक्ष पहनते हो… सब बकवास है… असे हिणवत आणि भोसले यांच्या हातावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या टॅटूवरूनही अपशब्द वापरत मुस्लिम महिलेने आणि तिच्या साथीदारांनी बॅगमधून धारदार वस्तू काढत भोसले यांच्यावर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या शीतल भोसले यांनी वापी स्टेशनवरील पोलिसांकडे मदतीसाठी टाहो फोडण्यासाठी खिडकीतून हात बाहेर काढताच एका मुस्लिम तरुणाने त्यांना मागे खेचत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. (Woman attacked in Avantika Express Marathi News)

Avantika Express Woman Attacked  | रुद्राक्ष माळेवरून अवंतिका एक्सप्रेसमध्ये महिलेवर हल्ला

महिलेला विवस्त्र करण्याचाही प्रयत्न | Avantika Express Woman Attacked 

तसेच हल्लेखोरांनी सलवार खेचत त्यांना विवस्त्र करण्याचाही प्रयत्न केला. हेल्पलाइनवर तक्रार केल्यानंतर याची गंभीर दखल घेत वलसाड रेल्वे पोलिसांनी अवंतिका एक्स्प्रेसमध्ये चढून हल्लेखोर महिलेसह दोघांना बेडय़ा ठोकल्या. दरम्यान या घटनेने ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून चौघांना ताब्यात घेण्यात आलंय.

ठाणे येथे राहात असलेल्या अॅड. शीतल भोसले यांचा मुलगा इंदोर येथे शिक्षण घेत आहे. शाळेला सुट्टी पडल्याने त्याला आणण्यासाठी भोसले या 3 मे रोजी रात्री अवंतिका एक्स्प्रेसच्या सामान्य डब्यातून प्रवास करत होत्या. या डब्यात बहुतांश सहप्रवाशी अल्पसंख्याक होते. शेजारी बसलेल्या मुस्लिम महिलेने अपशब्द वापरल्यानंतर शीतल भोसले यांनी मी तुम्हाला तुमचा बुरखा बकवास आहे असे म्हणाले का? मग तुम्ही माझ्या माळेवरून का बोलता, असा सवाल केला. त्यावरून या महिलेने शीतल भोसले यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here