केदारनाथमध्ये पुन्हा एकदा हिमस्खलन, दृश्ये पाहून लोकांचा रोखला गेला श्वास

0
फोटो: पीटीआय

केदारनाथ,दि.30: केदारनाथ मंदिरामागील टेकड्यांवर रविवारी सकाळी पुन्हा एकदा हिमस्खलन झाले. मात्र, या हिमवादळामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. पहाटे हिमस्खलनाची धक्कादायक घटना घडली. मंदिराच्या पाठीमागे असलेल्या डोंगरावरुन मोठ्या प्रमणात बर्फ खाली कोसळला. पहाटे 5.06 वाजता गांधी सरोवरच्या वरच्या डोंगरावरून मोठ्या प्रमाणात बर्फ कोसळू लागला.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील हिमस्खलनाचे दृश्य पाहून अनेकांचा थरकाप उडत आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. काही दिवसांपूर्वीच शास्त्रज्ञांनी हिमालयाच्या उंच भागातील हिमनद्या वितळू लागल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याला काही दिवस उलटत नाही तोच हिमस्खलन घडले आहे. देशभर प्रसिद्ध झालेल्या केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी हिमस्खलनाच्या घटनेचा व्हिडीओ बनवला आहे.

केदारनाथचे सेक्टर ऑफिसर सांगतात की या बर्फाळ टेकडीवर वेळोवेळी हिमस्खलन होत असते. केदारनाथ धामच्या मागे असलेल्या बर्फाच्या टेकडीवर रविवारी पहाटे पाचच्या सुमारास हिमस्खलन झाले. टेकडीवरून मोठ्या प्रमाणात बर्फ कोसळू लागला. यानंतर केदारनाथमध्ये खळबळ उडाली. हे हिमस्खलन बराच वेळ होत राहिले. 

केदारनाथमधील चोरबारीवर हिमालयात ही घटना घडली. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये हिमनदी तुटल्याने बर्फाचा ढग उसळला आणि काही वेळातच तो खोल दरीत कोसळला. उत्तराखंडमध्ये अनेक हिमनद्या सतत वितळत आहेत. त्यांचा वितळण्याचा वेग अधिक आहे. हिमनद्या दरवर्षी 15 ते 20 मीटरने वितळत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here