मुंबई,दि.16: ATM In Train: आता रेल्वेतही ATM सुविधा मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना पैसे काढता येणार आहेत. भुसावळ विभागाने पंचवटी एक्सप्रेसमध्ये देशातील पहिल्या ऑनबोर्ड एटीएम सेवेची चाचणी सुरू केली आहे. धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेली ही भारतातील पहिलीच एक्सप्रेस ठरली आहे. त्यामुळं आता प्रवाशांना धावत्या ट्रेनमधूनही पैसे काढता येणार आहे.
महाराष्ट्र बँकेच्या सहकाऱ्याने एटीएम सेवा | ATM In Train
अनेकदा लांबचा प्रवासात हा 24 तासापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे प्रवाशांना पैसे काढण्यासाठी आता रेल्वेतच सोय करण्यात आली आहे. भुसावळ विभाग महाराष्ट्र बँकेच्या सहकाऱ्याने चालत्या ट्रेनमध्ये देशातील पहिली ऑनबोर्ड एटीएम सेवा सुरू करण्यासाठी चाचण्या घेत आहे. रेल्वेतच एटीएम सेवा उपलब्ध करून देत भुसावळ विभागाने एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे. रेल्वे प्रवासाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
मध्य रेल्वेच्या मनमाड वर्कशॉपमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करुन एक खास कोच तयार करण्यात आला आहे. त्यातच हे एटीएम बसवण्यात आले असून हा कोच आता पंचवटी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी एटीएम सेवा असलेली ही ट्रेन मुंबईत दाखल झाली आहे.